सुरुवात कशी झाली ?

छत्रपती शिवराय स्मारक समिती, शिवाजी चौक, हिवरी नगर

मागिल अनेक वर्षांपासुन छत्रपती शिवराय स्मारक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रम व उपक्रमांमुळे अगदी कमी वेळेतच राजे शिवाजी चौक, हिवरी नगर, नागपुर येथील हे शिवस्मारक संपुर्ण विदर्भात नाव लौकीक मिळविलेले एक शिवभक्तांसाठी श्रद्धेचे स्थान आहे. शिवजयंती असो की राज्याभिषेक सोहळा सर्वप्रथम सामाजिक हित जोपासुन समितीचे सर्व सदस्य कार्यरत असतात. मागिल २ वर्षांपासुन कोविड मुळे शिवराज्याभिषेक सोहळा थाटात साजरा करता आला नाही. मात्र वेळ काळ व परिस्थीतीची जाणीव ठेऊन कोविड च्या नियमांचे पालन करून काही लोकांतच कार्यक्रम झाला. ६ जुन २०२० ला अनेक गरजुंना अन्न-धान्य व किराणा साहित्यांच्या किट तयार करुन वाटप करण्यात आल्या. ५ व ६ जुन २०२१ ला आरोग्य शिबीर, निःशुल्क डीजीटल एक्स-रे, नेत्र तपासणी व निःशुल्क चष्मे वितरण शिबीर, निःशुल्क औषधी वाटप शिबीराचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले. तसेच समितीच्या वतीने अपंग गरजु व्यक्ती श्री. कृष्णराव मारखंडे मोहने (रा. शास्त्रीनगर झोपडपट्टी, नागपुर. वय – ५९ वर्षे) यांना बॅटरी वर चालणारी सायकल निःशुल्क देण्यात आली. दरवर्षी समितीच्या वतीने १९ फेब्रुवारीला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते त्यात दरवर्षी १०० च्या वर शिवभक्त रक्तदान करतात. त्यामुळे अनेक गरजु लोकांना निःशुल्क रक्त पुरवठा देण्यासाठी समिती तत्पर असते. संपुर्ण कोविडच्या काळात लोकांना निःशुल्क किंवा अल्पदरांत रक्ताची सोय आम्ही केली.