
आमच्याबद्दल थोडंसं
इ.स. २००२ ला हिवरी नगर चौकात शिवाजी चौक नावाचे फलक स्थानिक शिवप्रेमींच्या वतीने लावण्यात आले. तेव्हापासुन आजवर दरवर्षी शिवजयंती चा उत्सव साजरा करण्यात येतो. मात्र २०११ पासुन कार्यक्रमाचे स्वरूप दिवसेंदिवस वाढले असुन अनेक सामाजिक व राजकिय संघटना या ठिकाणीb कार्यक्रम करत असतात. त्यामुळे नागरीकांची या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी झाली. शासन दरबारी अनेक पत्र व्यवहार झाले नगरसेवक, आमदार, महापौर, आयुक्त पदांवर असलेल्या अनेकांना निवदेन देण्यात आले. परंतु काहीही झाले नाही. परंतु या सर्व घडामोडी करतांना अनेक त्रास जितका तेव्हा होता तितकाच आजही आहे.
छत्रपती शिवराय स्मारक समिती, शिवाजी चौक, हिवरी नगर
मागिल अनेक वर्षांपासुन छत्रपती शिवराय स्मारक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रम व उपक्रमांमुळे अगदी कमी वेळेतच राजे शिवाजी चौक, हिवरी नगर, नागपुर येथील हे शिवस्मारक संपुर्ण विदर्भात नाव लौकीक मिळविलेले एक शिवभक्तांसाठी श्रद्धेचे स्थान आहे.




सामाजिक कार्ये
सामाजिक कार्ये
समर्थन देणाऱ्या संस्था

