349 व्या शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त 6 जून ला सकाळी 6 वाजता विधिवत मंत्रोच्चारात श्री वृषभ वांध्रे यांच्या सह संपुर्ण कुटुंबा तर्फे पूजन करण्यात आले

शिवस्मारक बहु. संस्था द्वारा संचालित छत्रपती शिवराय स्मारक समिती तर्फे 349 व्या शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त 6 जून ला सकाळी 6 वाजता विधिवत मंत्रोच्चारात श्री वृषभ वांध्रे यांच्या सह संपुर्ण कुटुंबा तर्फे पूजन करण्यात आले. सायंकाळी 6 वाजता 11 नवविवाहित जोडप्यांच्या शुभहस्ते पूजन व महाआरती करण्यात आली. आम्ही नवयुवक ढोल ताशा पथक, शिवशक्ती आखाडा तसेच संपूर्ण […]

शिवस्मारक बहु. संस्था द्वारा संचालित छत्रपती शिवराय स्मारक समिती तर्फे 349 व्या शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त 6 जून ला सकाळी 6 वाजता विधिवत मंत्रोच्चारात श्री वृषभ वांध्रे यांच्या सह संपुर्ण कुटुंबा तर्फे पूजन करण्यात आले. सायंकाळी 6 वाजता 11 नवविवाहित जोडप्यांच्या शुभहस्ते पूजन व महाआरती करण्यात आली. आम्ही नवयुवक ढोल ताशा पथक, शिवशक्ती आखाडा तसेच संपूर्ण राजे शिवाजी चौकातील रंगबिरंगी लाईटच्या रोषणाई, चौकात मोठा उभारलेला ट्रस्ट यावर लहान मुलांपासून ते तरुणाई व प्रौढ महिला पुरुषांनी देखील या दिमाखदार सोहळ्यात सहभागी होऊन कधी ना काळी पाहिलेला जल्लोष केला. सर्वधर्मीय गाण्यांच्या तालावर संपूर्ण तरुणाईत जोश संचारला व सर्वांनी मनसोक्त पणे आपला आनंद या कार्यक्रमात दाखविला. अनेक उद्योजकांचा शिवमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. सतत 45 दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत कार्य करणाऱ्या समितीच्या सर्वांना उपस्थीत जनसमुदाय पाहून कार्यक्रम यशस्वी केल्याचा आनंद होता. सोहळ्याला समितीचे अध्यक्ष महेंद्र कठाने यांनी 1 जिवंत असे स्वरूप प्रदान केले आहे. 6 जून ला रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग नागपुरात देखील राजे शिवाजी चौक, हिवरी नगरातील शिवस्मारका जवळ नागपूरकरांनी अनुभवला. या भव्य यशस्वी आयोजन करिता समितीचे महेन्द्र कठाने, राजेश बांडबुचे, यश नरड, आशिष खुबाळकर, नरेंद्र मगरे, शुभम बेहरे, अंकित मुळेवार, अतुल दाबे, हिमांशू पाटील, परिक्षीत येंडे, आकाश थेटे,मयूर अटाळकर, वैभव शिंदे पाटील, गोपाल गायधने, जयेश बिहारे, वैभव ठाकरे, विनोद निनावे, मयूर सतीबावणे, साहिल धकाते, वृशभ वांढरे, राकेश बांते, सौरभ महुरकर, शुभम माहुरकर, ओम वाडीभस्मे, स्वप्निल लांजेवार, रोहित कळमकर, राहुल पेठे, साहिल पेठे, ओम वादिभस्मे, रोहित श्रीरंग, धीरज चोपडे, दीपक बोकडे, विक्की साबळे, प्रतीक बावनकर, यांनी अथक प्रयत्नांनी हा सोहळा दैदीप्यमान झाला.

Share the Post:

संबंधित पोस्ट

शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजळांच्या शुभहस्ते करण्यात आले

शिवस्मारक बहु. संस्था द्वारा संचालित छत्रपती शिवराय स्मारक समिती तर्फे शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन

Read More

मागिल अनेक वर्षांपासुन छत्रपती शिवराय स्मारक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रम

मागिल अनेक वर्षांपासुन छत्रपती शिवराय स्मारक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रम व उपक्रमांमुळेअगदी कमी वेळेतच राजे शिवाजी चौक, हिवरी नगर, नागपुर

Read More