शिवस्मारक बहु. संस्था द्वारा संचालित छत्रपती शिवराय स्मारक समिती तर्फे शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजळांच्या शुभहस्ते करण्यात आले, यावेळी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राकापा शहर अध्यक्ष दूनेश्वर पेठे प्रामुख्याने उपस्थित होते. समिति तर्फे आयोजित भव्य दिव्य सोहळा पाहून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांनी या शुभकार्यात नागरिकांनी योगदान द्यावे,तसेच शिवकार्य पुढे नेण्यासाठी सहकार्य करावे असे आवहनही उपस्थित जनसमुदायाला केले. यावेळी ढोल ताशांच्या गजरात शिवभक्त तल्लीन झाले होते तर नवतारुण्य आखाडा तर्फे शिवकालीन थरारक अशी शश्त्राचे खेळ झाले, लहान मुलांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. उपस्थीत लोकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे हे खेळ व आयोकांकडून केलेल्या व्यवस्थेचे माजी मंत्री अनिल देशमुखांनी स्तुतिकेली. या सोहळ्या साठी अहोरात्र झटत असणारे समितीचे अध्यक्ष महेंद्र कठाने,राजेश बांडबुचे, यश नरड, आशिष खुबाळकर, नरेंद्र मगरे, शुभम बेहरे, अंकित मुळेवार, अतुल दाबे, हिमांशू पाटील, परिक्षीत येंडे, आकाश थेटे,मयूर अटाळकर, गोपाल गायधने, वृषभ वांढ्रे, वैभव ठाकरे, मयूर सतीबावणे, साहिल धकाते, ओम वाडीभस्मे, स्वप्निल लांजेवार, रोहित कळमकर, आदीं अथक परिश्रम घेत आहेत.

349 व्या शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त 6 जून ला सकाळी 6 वाजता विधिवत मंत्रोच्चारात श्री वृषभ वांध्रे यांच्या सह संपुर्ण कुटुंबा तर्फे पूजन करण्यात आले
शिवस्मारक बहु. संस्था द्वारा संचालित छत्रपती शिवराय स्मारक समिती तर्फे 349 व्या शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त 6 जून ला सकाळी 6