मागिल अनेक वर्षांपासुन छत्रपती शिवराय स्मारक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रम व उपक्रमांमुळे
अगदी कमी वेळेतच राजे शिवाजी चौक, हिवरी नगर, नागपुर येथील हे शिवस्मारक संपुर्ण विदर्भात नाव लौकीक
मिळविलेले एक शिवभक्तांसाठी श्रद्धेचे स्थान आहे. शिवजयंती असो की राज्याभिषेक सोहळा सर्वप्रथम
सामाजिक हित जोपासुन समितीचे सर्व सदस्य कार्यरत असतात.
मागिल २ वर्षांपासुन कोविड मुळे शिवराज्याभिषेक सोहळा थाटात साजरा करता आला नाही. मात्र वेळ
काळ व परिस्थीतीची जाणीव ठेऊन कोविड च्या नियमांचे पालन करून काही लोकांतच कार्यक्रम झाला. ६ जुन
२०२० ला अनेक गरजुंना अन्न-धान्य व किराणा साहित्यांच्या किट तयार करुन वाटप करण्यात आल्या. ५ व ६
जुन २०२१ ला आरोग्य शिबीर, निःशुल्क डीजीटल एक्स-रे, नेत्र तपासणी व निःशुल्क चष्मे वितरण शिबीर,
निःशुल्क औषधी वाटप शिबीराचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले. तसेच समितीच्या वतीने अपंग गरजु
व्यक्ती श्री. कृष्णराव मारखंडे मोहने (रा. शास्त्रीनगर झोपडपट्टी, नागपुर. वय – ५९ वर्षे) यांना बॅटरी वर चालणारी
सायकल निःशुल्क देण्यात आली. दरवर्षी समितीच्या वतीने १९ फेब्रुवारीला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
करण्यात येते त्यात दरवर्षी १०० च्या वर शिवभक्त रक्तदान करतात. त्यामुळे अनेक गरजु लोकांना निःशुल्क रक्त
पुरवठा देण्यासाठी समिती तत्पर असते. संपुर्ण कोविडच्या काळात लोकांना निःशुल्क किंवा अल्पदरांत रक्ताची
सोय आम्ही केली.
१९ फेब्रुवारी ला शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्य मागील २ वर्षांपासुन नर्सरी ते वर्ग ९ पर्यंतच्या
विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन फेब्रुवारी २०२१ मध्ये ३३६ तर फेब्रुवारी २०२२ मध्ये २३०९ नागपुर
शहर व ग्रामिण मधील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. सर्वांना सन्मान पत्र व १८ ठिकाणी झालेल्या सर्व
विजेत्यांना शैक्षणिक साहित्य व समितीचे सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. समितीचे कार्यक्षेत्र
शिवस्मारका पुरतेच नसुन अनेक क्षेत्रात काम करत असते.
शिवछत्रपतींची पुर्णाकृती मुर्ती या ठिकाणी स्थापित व्हावी हा आपल्या सर्वांचा मानस आहे. त्या संबंधी
राज्यसरकार,महानगर पालिका नागपुर, पोलिस प्रशासन यांच्याशी वेळोवेळी संपुर्ण पत्रव्यवहार सुरु आहे.
शिवछत्रपतींची कृपा झाली तर लवकरच या शुभस्थळी सिंहासनाधिश्वर स्वरुपात महाराज स्थापित होतील हिच
अपेक्षा.
कार्यक्रमासाठी तसेच समितीच्या सर्व कार्यात कठोर परिश्रम घेणाऱ्या समितीच्या सर्व सदस्यांचे व
वेळोवेळी सहयोग करणाऱ्या समाजसेवी बांधवांचे, पोलिस प्रशासन, मनपा प्रशासन, दैनिक वर्तमान पत्र,
इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे या शुभकार्याप्रसंगी शतशः आभार !

349 व्या शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त 6 जून ला सकाळी 6 वाजता विधिवत मंत्रोच्चारात श्री वृषभ वांध्रे यांच्या सह संपुर्ण कुटुंबा तर्फे पूजन करण्यात आले
शिवस्मारक बहु. संस्था द्वारा संचालित छत्रपती शिवराय स्मारक समिती तर्फे 349 व्या शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त 6 जून ला सकाळी 6